बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात आज बुधवारी (दि.16) कोरोनाची 38 नवे रुग्ण निष्पन्न झाले. जिल्ह्यातील 785 जणांची चाचणी करण्यात आली. यातील 747 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले
बाधितांमध्ये अंबाजोगाई 6, आष्टी 7, बीड 13, धारूर 4, गेवराई 3, केज 2, शिरूर 1 आणि वडवणी तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 16 हजार 266 एवढी झाली आहे. पैकी 15 हजार 365 जण कोरोनामुक्त झाले असून 517 जणांचा मृत्यू झाला आहे.
Leave a comment