आष्टीचा तो " किलर बिबट्या "अजूनही मोकाटच
आष्टी : प्रतिनिधी
मागील सहा दिवसांत आष्टी तालुक्यामध्ये बिबट्याने तीन जणांचा जीव घेतला आहे यानंतर वनविभागाच्या अनेक टीम तालुक्यात दाखल झाल्या असून सर्वतोपरी प्रयत्न करूनही वनविभागाला हाती काहीच लागले नाही मात्र तो किलर बिबट्या अजूनही मोकाटच असून आणखी पुढे काय होणार या प्रश्नाचे उत्तर मात्र आजपर्यंत मिळाले नाही. दिनांक 24 रोजी सुरुडी येथे तालुक्यातील पहिला बिबट्याने बळी घेतला त्यानंतर तो दररोज साधारण 12 ते 15 किमी अंतर कापत असून सध्या तो पुढे पुढे सरकत चालला असल्याचे चित्र दिसत आहे.
आष्टी तालुक्यामध्ये सुरुडी येथे नागनाथ गर्जे ,किनी मध्ये स्वराज भापकर तर पारगाव मध्ये सुरेखा भोसले यांचा बिबट्याने बळी घेतला आहे त्यानंतर वन विभागाच्या अनेक टीम आष्टी तालुक्यात दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन राबवित आहेत वनविभागातील अनेक तज्ञ याठिकाणी त्याचा शोध घेत आहेत मात्र या सर्व वन विभागाच्या टीमला तो किलर बिबट्या गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या बिबट्याच्या दहशतीचे वातावरण असून शेतकरी वर्ग व मजूर वर्ग कामाला जायला तयार होत नाही कोरोनाची एवढी धास्ती घेतली नव्हती एवढी या बिबट्याची तालुका वाशीयांनी घेतली असून त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे सध्या गहू पेरणी हरभरा पेरणी केलेली असून या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये जायचे म्हणजे जीवावर प्रसंग ओढवले जाणवत असल्याने अनेकांनी सांगितले. शेतीला पाणी नको पण घरात राहून सुरक्षित राहू असा पवित्रा घेतला आहे
याबाबत आमच्या प्रतिनिधीने पारगाव येथे जाऊन औरंगाबाद येथील मुख्य विभागीय वन अधिकारी प्रकाश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आष्टी तालुक्यामध्ये सध्या नगर पुणे बुलढाणा अमरावती नाशिक इत्यादी ठिकाणच्या सतरा टीम बिबट्याचा शोध घेत आहेत यामधील चार टीम बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी शोधताहेत तर बारा टीम यांनी रानात,जंगलात शोध मोहीम सुरू केली असून जनजागृतीही करत आहेत. 150 कर्मचारी व शंभर ग्रामस्थ आज पारगाव मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी शोध घेत आहेत. पारगाव मध्ये ज्या ठिकाणी रात्री दुर्घटना घडली त्या ठिकाणी बिबट्या सकाळी पुन्हा येऊन गेला असल्याचे ठस्यावरून सिद्ध होत आहे या सर्व टीम रात्रंदिवस जागत असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करू असेही महाजन यांनी सांगितले.....
तालुक्यामध्ये तीन बळी घेणारा बिबट्या अजूनही मोकाट असून तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे अजूनही तो यानंतर माणसांचे जीव घेऊ शकतो त्यासाठी ही अखेर बिबट्याला ठार मारावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे..
Leave a comment