नगराध्यक्ष शेख मंजुर यांची माहिती
माजलगाव । वार्ताहर
शहरातील वाढत्या चोर्याचे प्रमाण लक्षात घेऊन शहरातील मुख्य रोडवर व्यापारी बंधू व जनतेसाठी नगर परिषदेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार चालू आहे अशी माहिती नुतन नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी दिली. माजलगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने गुरुवार रोजी माजलगाव नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख मंजूर यांचा व्यापारी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, शहरातील व्यापारी बाधंवाना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देऊत.शहरातील कचरा व घानीचे योग्य व्यवस्थापन करुन शहरात स्वच्छ व सुदंर बनवु. तसेच व्यापारी बंधूचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. अध्यक्षस्थानी रामराजे रांजवन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न.प.गटनेते रोहन घाडगे,ईश्वर होके,व विजय शिंदे हे होते.सुत्रसंचालन भगवान शेजुळ यांनी केले तर प्रस्ताविक संजय इंदानी यांनी केले तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांनी शहरातील व्यापारी मित्रांच्या विविध समस्या या प्रसंगी मांडल्या.व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित व सर्व पोट संघटनेचे पदाधिकारी,200व्यापारी बंधू या कार्यक्रमला उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महासंघाची महासचिव सुनील भांडेकर,जफर मिर्झा,गणेश लोहिया,शेख सल्लाउदी,मोहन घुले,फेरोज ईनामदार व आधार मल्टिस्टेट चा संपूर्ण स्टाप यांनी विशेष मेहनत घेतली.
Leave a comment