बीड । वार्ताहर
जिल्हयातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक-2020 ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राहूल रेखावार, जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील नियम 142(1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या रविवार दिनांक 29 नोव्हेंबर 2020 सायंकाळी 5.00 वाजेपासून मंगळवार, दिनांक 1 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. उक्त कालावधीत सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल.
Leave a comment