बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आज गुरुवारी (दि.26) कोरोनाचे नवे 74 रुग्ण निष्पन्न झाले. दरम्यान काल बुधवारी बीड शहरातील 60 वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली. त्यानंतर गुरुवारी 1434 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 1360 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले 74 अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यात 632 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
गुरुवारच्या बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 14, आष्टी 20, बीड 19, धारुर 1, गेवराई 2, केज 4, माजलगाव 5, परळी 4, पाटोदा 1, शिरुर 1 व वडवणी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 15 हजार 416 इतका झाला असून 481 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 303 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 768 शाळांमधील 6 हजार 600 शिक्षकांची कोरोना चाचणी सुरु करण्यात आली असून बुधवारपर्यंत 6 हजार 296 शिक्षकांची चाचणी करण्यात आली यात जिल्ह्यात 65 शिक्षकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 843 रिपोर्ट प्रलंबित आहेत.
Leave a comment