बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आज शुक्रवारी (दि.6) 877 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यात 804 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 73 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई 6, आष्टी 8, बीड 22, धारूर 4, गेवराई 1, माजलगाव 5, परळी 8, पाटोदा 4, शिरूर 8 व वडवणी 3 येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली.
कोरोना धोका अजुनही कायम आहे. गुरुवारी (दि.5) बीड जिल्ह्यात आणखी 4 जणांच्या मृत्यूची नोंद ‘आयसीएमआर’च्या पोर्टलवर झाली आहे. त्यामुळे एकुण मृत्यूसंख्या 432 झाली आहे. मृत्यूंमध्ये गेवराई तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, बीड शहरातील बालेपीर येथील 55 वर्षीय पुरुष, बीडच्या पंचशीलनगरमधील 72 वर्षीय पुरुष व चिंचवडगाव (ता.वडवणी) येथील 98 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. वाढत्या मृत्यूसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.
Leave a comment