बीड | वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. सोमवारी (दि.21) आणखी 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 8 हजार 462 इतका झाला आहे.
रविवारी (दि.20) एकूण 955 स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी बारा वाजता आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यामध्ये 822 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 33 रुग्ण आढळले. पाठोपाठ अंबाजोगाई 15, आष्टी 8, धारुर 6, गेवराई 11, केज 16, माजलगाव 10, परळी 24, पाटोदा 5, शिरुर 2 आणि वडवणी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे.
Leave a comment