बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात सोमवारपासून चार शहरांसह 40 गावांमध्ये अॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यात एकुण 6055 जणांची तपासणी झाली. यापैकी 5651 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर रॅपिड अॅन्टिजेनमध्ये 228 नवे कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले होते. तर सोमवारचे (दि.14) थ्रोट स्वॅबसह जिल्ह्यातील सीसीसीमधील अॅन्टिजेन अहवाल मंगळवारी (दि.15) रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाले.यात 176 नवे कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र अनेकांनी मंगळवारी जिल्ह्यात 404 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाल्याचे बातम्यांमध्ये नमुद केले, आकड्यांचा गोंधळ केला.
Leave a comment