परळीतील मनहेलवणारी घटना

परळी । वार्ताहर
शहरातील पंचवटीनगर भागात राहणार्‍या श्रीमती हेरणबाई देशमुख यांचे काल 7 सप्टेंबर रोजी निधन झाले. आपल्या पत्नीच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने त्यांचे पती वैजिनाथराव देशमुख यांचे काल दुपारी निधन झाले. मनाला चटका लावणारी ही घटना परळी शहरात घडली आहे. 


काल दि.7 रोजी हिरणबाई यांचे निधन तर आज दि.8 रोजी त्यांचे पती वैजनाथराव देशमुख यांची प्राणज्योत मालवली. पंचवटीनगर भागातील रहिवासी असलेले देशमुख कुटुंबीय सर्वपरिचित आहे.धार्मिक व मनमिळाऊ स्वभावामुळे ते ओळखले जातात.हिरणबाई देशमुख यांच्या निधनाने कालपासून शोकाकुल वातावरण असतांनाच आज दि.8 रोजी त्यांचे पती वैजनाथराव तात्याराव देशमुख (मोहेकर) वय 70 वर्षे यांची प्राणज्योत मालवली.ते न्यु हायस्कूल शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.