विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र, पालकांना आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार

शिक्षकांनाही पूर्णवेळ काम करण्यास परवानगी

 

बीड | वार्ताहर

 

सध्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज आणि आष्टी या शहरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दाखला आणि गुणपत्रक घेण्यासाठी शाळेत जाता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना परवानगी देण्यासंबंधीचे आदेश आज मंगळवारी जारी केले आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बीड,अंबाजोगाई,माजलगाय,परळी, केज व आष्टी हे  6 शहर दिनांक 12 ते 21 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद राहील असे आदेश पारीत करण्यात आले होते, दरम्यान 10 वीचा निकाल घोषित झालेला असून वरील सहा शहरामधील विद्यार्थ्यांना इतर शहरामधील कॉलेजसाठी प्रवेश घेण्यासाठी आणि या संस्थांच्या प्रवेशाची अंतिम तारीख जवळ आलेली असल्यामुळे इयत्ता 10 वर्गातील दाखला व गुणपत्रिका  काढण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, इयत्ता दहावी पास विद्यार्थी व त्यांचे एक पालक यांना फक्त टि.सी. व मार्क मेमो या सहा शहरामधील शाळेमधुन काढणेसाठी परवानगी असेल. या शहरामध्ये प्रवेश करण्यास व शाळेमध्ये जाणे यासाठी पासची आवश्यकता असणार नाही, परंतु शाळेचे ओळखपत्र व पालकांचे आधारकार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असेल. संबधित शाळेचे शिक्षकांना यासाठी वेळेच कोणतेही बंधन न  ठेवता 24 तास दररोज शाळेमध्ये थांबून कामकाज करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. इयत्ता 10 वी पास विद्यार्थी/पालक हे शाळेमध्ये आल्यानंतर एकाच टिकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करुन कोव्हीड-19 विषयक सामाजिक अंतर पाळणे बाबत प्रत्येक शाळेने सक्त सुचना द्याव्यात आणि त्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.