श्रावण महिन्यानिमित्त भाविकांना आकर्षण श्रावण सरी

मंठा । वार्ताहर

मंठा शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक हेलस नगरी अर्थातच  हेलावंती नगरी मधील पुरातत्व हेमाडपंती हर हर महादेव मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले असून श्रावण महिन्यानिमित्त सर्वच भाविक भक्त कोरणा च्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून दुरूनच दर्शन घेऊन आध्यात्मिक समाधान घेत आहेत मंठा शहराच्या पूर्वेला मध्य रस्त्यातून अवघे तीन किलोमीटर तर मंठा जिंतूर हायवे वरून अवघे दीड किलोमीटर अंतर असलेल्या या निसर्गरम्य पुरातत्व हेमाडपंती हर हर महादेव संस्थानमध्ये दरवर्षी अनेक भाविक पूजा अभिषेक व दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारा महादेव म्हणून अनेक भाविक भक्त सोळा सोमवारचा उपवास सोमवारचा उपवास व भंडारा  महाप्रसाद करत असतात महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्र व अमली बारस निमित्त भाविक मोठी गर्दी करतात तसेच या मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त भाविक भक्ती दरवर्षी गर्दी करत असतात परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा संसर्ग असल्याने शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन भक्तमंडळी सोशल डिस्टन्स राखून  दुरूनच दर्शन घेऊन अध्यात्मिक समाधान भक्त मंडळी घेत आहे हर हर महादेव मंदिर अत्यंत आकर्षक देखणे पुरातन हेमाडपंती असून या मंदिरांमध्ये गाभार्‍यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी हर हर महादेवाची पिंड आहे.

मंदिरामध्ये पार्वती माता श्री गणेश दत्तात्रेय महानंदी अशा आकर्षक मूर्ती बसवलेल्या असून निसर्गाने नटलेला हर हर महादेव मंदिराचा परिसर सर्वांना सहज आकर्षित करतो मंदिराच्या बाजूलाच असलेला पुरातन दगडी बारा या पुरातत्त्व ची साक्ष देतो मंदिर परिसराचा विकास ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे भक्तांना थांबण्यासाठी भक्तनिवास सांस्कृतिक सभागृह प्रचंड वृक्ष लागवड मुबलक पिण्याचे पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे हेलस गावाला मोठा इतिहास असून या गावां व शिवारामध्ये सुमारे बारा मारूतीचे मंदिर असून जागृत गणपतीचे मंदिर गावात आहे महादेव मंदिराप्रमाणेच शतकोत्तर गणेश उत्सव  हेलस गावांमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो गणेशोत्सवामध्ये कोणीच गणेशाची स्थापना करत नाहीत गणेश मंदिरात जाऊन सर्वजण विधीवत पूजा करतात गणेशोत्सवानिमित्त मराठी नाटकाची शतकोत्तर परंपरा आजही अखंडित सुरू आहे गावामध्ये पुरातन श्री कालिंका देवी मंदिर श्री हेमावती मंदिर दत्तात्रेय मंदिर रामाचे मंदिर आहेत तर हेलस या गावाला पूर्वी हेलावंती नगरी असे नाव होते असे जुने जाणकार मंडळी सांगतात या नगरी वरती हेमाडपंत नावाचा राजा राज्य करीत होता अशीही आख्यायिका आहे हेमाडपंती राजा आणि त्यांच्या भाच्याची मूर्ती गावाच्या पश्‍चिम दिशेला आहेत याच हेमाडपंती राजाने अनेक हेमाडपंथी मंदिराची निर्मिती उभारणी केल्याचे गावातील जुनी जाणकार मंडळी सांगतात ऐतिहासिक सांस्कृतिक आध्यात्मिक राजकीय दृष्ट्या एक वेगळं महत्त्व असलेलं हेलस गाव देव-देवतांच्या मंदिरामुळे सर्वांना स्त्रोत आहे गाव परिसरातील मंदिरे गावालगत असलेली खळखळून वाहणारी नदी या नदीला ही  वेगळाच इतिहास आहे रामतीर्थ येथे राम व सीता ज्या ठिकाणी वास्तव्यास होता त्या ठिकाणचे पाणी या नदीला येत असल्याचे गावकरी सांगतात गावाच्या शिवारातच मोठमोठाले डोंगर हिमालयाची साद घालून सर्वांनाच खुणावत असतात या ऐतिहासिक नगरीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या  पर्यटन विभागाकडे सुमारे 3 कोटी 41 लाख रुपयाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे या या प्रस्तावाच्या माध्यमातून निधी मिळाल्यास पुरातन बारवांची दुरुस्ती गावातील पालखी मार्ग गाव ते मंदिर सिमेंट रस्ता मंठा जिंतूर हायवे लगत भव्य कमान नदीवरील घाट सांस्कृतिक सभागृह पार्किंग व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन हायमास्ट दिवे भव्य गार्डन करण्यात येणार आहे मंदिर आर्थिक दृष्ट्या सक्षम असून मंदिराला मोठी जमीनही असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हेलस गावचे सरपंच पांडुरंग खराबे पाटील यांच्या पुढाकाराने पर्यटन विभागाला गतवर्षी तीन कोटी 41 लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून कोरोना संसर्ग परिस्थिती निवडल्यावर हा प्रस्ताव निश्‍चितच मंजूर होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला चौकट चौकट ऐतिहासिक  हेलावंती नगरी अर्थातच हेलस गावातील ऐतिहासिक मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे रीतसर तीन कोटी 41 लक्ष रुपयाचा विविध विकास कामासाठी प्रस्ताव पाठवला असून कोरणा संसर्ग परिस्थिती निवडल्यावर तो निश्‍चितच  मंजूर होईल व हेलावंती नगरी चे रूप निश्‍चितच पालटलेले दिसेल पांडुरंग खराबे पाटील सरपंच ग्रामपंचायत हेलस ता.मंठा.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.