बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असली तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार आज बुधवारी (दि.12) बीड जिल्ह्यातील 52 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत.
यात बीडमधून 9, पाटोदा 1, गेवराई 2, माजलगाव 8, धारूर 5, केज 5, अंबाजोगाई 7 तर परळी तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 2137 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले असून यापैकी 856 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत तर 52 रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात सध्या तब्बल 1229 कोरोना बाधीत रुग्णांवर कोव्हीड हॉस्पिटल आणि कोव्हीड विविध ठिकाणच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून 21 ऑगस्टपर्यंत बीड, परळी, माजलगाव, अंबाजोगाई, केज व आष्टीमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Leave a comment