बीड । वार्ताहर
कोवीड-19 ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात काही तक्रार असेल तर अशी व्यक्ती या बाबतीत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांची तक्रार लिखित स्वरुपात,पोस्टाद्वारे, ई-मेलद्वारे अथवा वकिलामार्फत दाखल करू शकेल असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
सुमोटो फौजदारी जनहीत याचिका क्र. 01/2020 स्वतःहून दाखल करून घेतली असून सदरील याचिका कोबीड-19 च्या अनुषंगाने दाखल असून सदर याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयाने दिनांक 31.07.2020 रोजी आदेश पारित केला असून सदर आदेशाची माहीती सर्वांना देणे बाबत निर्देश दिले आहेत. सदरील आदेशाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, जर कोणास कोवीड-19 ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात खालील काही तक्रारीं बाबत दाखल करता येईल असे नमूद केले आहे.
Leave a comment