गेवराई । वार्ताहर
गेवराई शहरातील एका कोरोना बाधित रुग्णाचा औरंगाबाद येथे उपचार घेत असताना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला,गेल्या पाच दिवसापासून त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते,या मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या 31 वर गेली आहे .
कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून दररोज चाळीस पन्नास रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे .रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे .गुरुवारी जिल्ह्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी गेवराई येथील एका व्यापाऱ्यांचा औरंगाबाद येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला .
काही दिवसांपूर्वी या व्यक्तींवर जमिनीच्या वादातून हल्ला देखील झाला होता,त्यावेळी देखील त्याच्यावर उपचार सुरू होते .त्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला आठवडभरापूर्वी कोरोनाची बाधा झाली,त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते .
शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली,जिल्ह्यातील बळींचा आकडा त्यामुळे 31 झाला आहे .
Leave a comment