बीडमधील चार दिवसातील दुसरी घटना
बीड | वार्ताहर
कुख्यात दरोडेखोराने बीडच्या कोव्हिड केअर सेंटरमधून पलायन केल्याची घटना गत शनिवारी (दि.25) घडलेली असतानाच आता आज बुधवारी (दि.29) सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील एका कोरोना बाधीत आरोपीने पलायन केले. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. आरोपी असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता की नव्हता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील पुजाऱ्याच्या खून प्रकरणात पोलिसांनी 11 जुलै रोजी इटकुर (ता.कळंब,जि. उस्मानाबाद) येथून या आरोपीस ताब्यात घेतले होते.दरम्यानच्या काळात त्याची कोरोना चाचणी झाली होती, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात 22 जुलैपासून उपचार सुरू होते.सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित आरोपी रुग्णाला सौम्य लक्षणे असल्याने त्यास आयआयटी येथे केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार होते. मात्र त्यापूर्वी त्याने आज बुधवारी सकाळी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले.हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनासह पोलिसात खळबळ उडाली आहे. दरम्यान चार दिवसात गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी फरार झाल्याने रुग्णालय आणि आयटीआय येथील।कोव्हीड केअर सेंटरमध्ये सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
Leave a comment