रुग्णांच्या वाढत्या मृत्यूने जिल्ह्यात कोरोनाची धास्ती

बीड | वार्ताहर

बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असतानाच कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.गत दोन दिवसात 2 रुग्णांचा मृत्यू झालेला असतानाच आज मंगळवारी ( दि.28) सकाळी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये आणखी एका वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

सदरील 66 वर्षीय कोरोना बाधीत महिला परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील रहिवासी असून 18 जुलैपासून या महिलेवर अंबाजोगाई येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.तिथे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सदरील महिलेचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात जुलै महिन्यात रुग्णांचा मृत्युदर वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील 70 वर्षीय पुरुष रुग्णासह याच तालुक्यातील नवीन वसाहत, भाटवडगाव येथील 80 वर्षीय महिलेचा कोरोनाने अंबाजोगाई येथे मृत्यू झाला, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान दोन रुग्णांचे मृत्यू होऊन 24 तासाचा कालावधी लोटला नाही तोच पुन्हा एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 27 झाली आहे.सोमवारी 24 तासात 66 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.त्यानंतर आज सकाळी अन्य एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.