प्रा आरोग्य केंद्राचे श्रेय लाटण्यासाठी आ सोळंके नी केले 'दुबार' भूमिपूजन


माजलगाव  / उमेशकुमार जेथलिया

मतदारसंघातील दिंद्रुड येथे होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ दोनच दिवसापूर्वी दि.२२ रोजी एका शेतकऱ्याच्या हस्ते करण्यात आला होता. परंतु त्याच कामाचे शुक्रवारी स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांनी परत भूमिपूजन केले या प्रकारामुळे दिंडरूड परिसरात दादा हे वागणं बर नव्ह..!अशी खमंग चर्चा सुरू आहे.
       केवळ   श्रेय लाटण्या साठी कोव्हिडं 19 च्या परिस्थितीत सार्वजनिक समारंभ घेण्यावर  आपत्कालीन कायद्याने बंदी असताना आ प्रकाश सोळंके सारख्या मातब्बर आमदारांनी दुबार भूमिपूजन करणे हा प्रकार माजलगाव मतदारसंघात तिल जनतेच्या पचनी पडला नाही.जिल्हाधिकारी कोविड 19 परिस्थितीत होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाकडे दुर्लक्ष का करत आहेत असे ही जनता विचारत आहे.
      आ सोळंके नी केलेला आजचा  प्रकार म्हणजे 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना'  असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटल्या आहेत.
            मतदारसंघातील दिंदृड येथे भाजप-शिवसेना सरकारच्या काळात  प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर केला होता. 23 जुलै 2019 रोजी या प्रा.आ.केंद्राच्या बांधकामासाठीच्या निधीस मंजुरी मिळाली होती. तर 4 सप्टेंबर 2019 रोजी पूर्णतः प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. गावचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी वेळोवेळी स्थानिक पासून ते मंत्रालयापर्यत पाठपुरावा करून या कामाच्या मंजुरीला मूर्त स्वरुप दिले.
           बांधकामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर सदरील कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ दि.२२ रोजी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हस्ते करून बळीराजाचा सन्मान करण्यात आला. मात्र परत त्याच कामाचा भूमिपूजन कार्यक्रम केल्यामुळे शेतकऱ्याचे हात शुभ नाहीत का? की आमदारांना शेतकऱ्यांची अलर्जी आहे असा सवाल उपस्थित होतो आहे. मतदार संघात करण्यासारखे खूप काही असताना एकाच कामाचे  दुसऱ्यांदा भूमिपूजन करून आमदारांना नेमके काय साध्य करायचे आहे असाही प्रश्न अनेकांना  पडला आहे.
मुख्यमंत्री सहायता आरोग्य कक्षाचे तत्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी  दिंदृड परिसरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विकास निधीतून ३ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला होता.

आ सोळंके नी सूड भावनेने वागणं बंद करायला पाहिजे


     आ प्रकाश सोळंके यांनी मागील 25 वर्षात कधीच सूडाच् राजकारण केले नसल्याचे ऐकिवात आहे पण यंदा शेवटची  निवडणूक म्हणत निवडून आलेल्या आ सोळंके यांनी सुडाचे राजकारण सुरू केल्याचे जाणवत आहे.त्यांच्या या सूड भावनेतून विविध संस्थेत लागलेले कर्मचारी ही वाचले नसून राजकीय संस्थांवर सूड उगवण्यासाठी 'दुष्मन का दुष्मन मेरा दोस्त और दुष्मन का दोस्त भी मेरा दोस्त'ही नवी शक्कल त्यांनी अंमलात आणली आहे हे विशेष..!शेवटी म्हणतात ना 'साठी बुद्धी नाठी' ते त्यांना ही लागू होत आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.