बीड तालुक्यात 23 रुग्ण
बीड | वार्ताहर
कोरोना संसर्ग बीड जिल्ह्यात वेगाने होऊ लागला असून नागरिकांची काळजी वाढली आहे.आज बुधवारी पहाटे 1 वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात आणखी 44 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक 23 बाधीत रुग्ण बीड तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. बीड आणि परळी तालुक्यात ही संख्या तुलनेने अधिक आहे.त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. आज पहाटेच्या अहवालानुसार,बीड तालुक्यात 23, गेवराई 8, परळी - 5, केज - 3, शिरूर तालुक्यात 2 तर अंबाजोगाई, पाटोदा व माजलगाव तालुक्यात प्रत्येकी 1 असे एकूण 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून सर्वांवर कोव्हीड केअर सेंटर व उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान आरोग्य विभागाकडून हे रुग्ण नेमके कोणत्या भागातील आहेत याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.शिवाय किती रुग्णांचे दररोज स्वॅब तपासणीला पाठवले जात आहेत, याऐवजी थेट किती रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत हे सांगितले जात आहे.
Leave a comment