माजलगाव । वार्ताहर
माजलगाव नगरपरिषदचे प्रभारी मुख्याधिकारी सध्या केजचे मुख्याधिकारी व मूळ जामखेडचे रहिवाशी हे आज कोरोना पॉझिटिव्ह आले असून अंबाजोगाई येथे उपचार घेत आहेत.
मूळ केज येथील व माजलगाव न.प.चा मुख्यधिकारी पदाचा प्रभार मागील आठवड्यात घेतलेले विशाल भोसले हे सोमवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आले.मागील शुक्रवारी ते माजलगाव न.प. कार्यालयात येऊन गेले होते.यावेळी नगराध्यक्ष प्रतिनधी व काही नगरसेवक तसेच न.प.चे काही कर्मचारी त्यांच्या समपर्कात आले होते. बीडचे नगरविकास कार्यालय सील केले असून माजलगाव न.प.चे कार्यालय अजून ही चालूच आहे. मुख्यधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॅब आज घेण्यात येणार असून सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.यामुळे माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे.अस्वस्थ वाटल्यामुळे उपचार घेतले सोमवारी सकाळी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तब्येत व्यवस्थित असल्याचे भोसले यांनी लोकप्रश्नशी बोलताना सांगितले.शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा घेण्याविषयी जिल्हाधिकारी निर्देश देतील.माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची नाव आरोग्य विभागास दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
Leave a comment