बीड । वार्ताहर
येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने प्रशासनातील प्रमुख अधिकार्‍यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात जिल्हा न्यायालयातील न्या.महाजन यांच्याकडे हे सॅनिटायझर आणि मास्क इंडिया बँकेचे क्षेत्रीतीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले आणि बँक अधिकारी असोसिएशनचे अमोल गायके यांनी सुपुर्द केले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील जनतेचील काळजी घेत असून प्रशासनात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क आवश्यक आहे. त्या दृष्टीने क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी पुढाकार घेऊन बँकेच्या वतीने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे सुपुर्द केले. जिल्हारूग्णालयातीलही काही कर्मचार्‍यांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले असून जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील सॅनिटायझर आणि मास्क पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. बँकेच्या या उपक्रमाचे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कौतुक केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.