आष्टी, गेवराई, अंबाजोगाईत प्रत्येकी 1 रुग्ण

 

 

बीड | वार्ताहर

 

बीड जिल्ह्यात आज रविवारी (दि.19) पहाटे  आणखी 14 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले आहेत. बीडमध्ये सर्वाधिक 6 तर परळीत पुन्हा 5 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय आष्टी, गेवराई व अंबाजोगाईत प्रत्येकी 1 रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

 

 

बाधीत रुग्णांमध्ये बीड शहरातील विद्यानगर पश्चिम येथील रहिवासी व खासगी  रुग्णालयातील 46 वर्षीय महिला, सावता माळी चौक येथील 78 वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनी, इमामपूर रोड येथील 60 वर्षीय महिला, भद्रा मारुती नगर, कॅनॉल रोड येथील 70 वर्षीय पुरुष, गणपती मंदिर, शाहूनगर येथील 50 वर्षीय पुरुष आणि कारंजा, खंदक येथील 45 वर्षीय पुरुष, सुलतानपूर (ता.गेवराई) येथील 55 वर्षीय पुरुष, गुरुकृपा कॉलनी परळी येथील 24 वर्षीय पुरुष, जुने रेल्वेस्थानक परळी येथील 31 व 38 वर्षीय पुरुष, भोई गल्ली परळी येथील 23 वर्षीय तरुण, बरकत नगर परळी  येथील रहिवासी व सध्या नांदेड जिल्हा रुग्णालयात दाखल असलेला 60 वर्षीय पुरुष, खिळद (ता.आष्टी) येथील 38 वर्षीय पुरुष आणि आदर्शनगर , अंबाजोगाई येथील 63 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

 

 

दरम्यान बीड जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 333 झाली आहे. पैकी 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता 147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.