डॉक्टरानो,प्रोफेशनल व्हा पण सोशल रहा..!
माजलगाव - उमेश जेथलिया
माजलगाव च्या काही हॉस्पिटल चे इंटेरिअर डेकोरेशन, हाय फय फर्निचर,हायमास्ट लॅम्प,हॉटेल लॉज सारखी बैठक व्यवस्था सगळं काही स्टँडर्ड कत्तल खान्या सारख..!माजलगाव च्या लॉज मध्ये ए सी रुम चे 24 तासाचे भाडे 800 रु पेक्षा जास्त नाही ;(लॉज एवढी स्वच्छता ही हॉस्पिटलमध्ये नसते)पण हॉस्पिटलमध्ये केवळ एका बेड चे काही तासाचे भाडे फक्त 800 रु घेतले जातात नर्सिंग चार्ज,तपासणी,ईसीजी,ऑक्सीजन चे चार्ज वेगळे मग यांना हॉस्पिटल म्हणावे की स्टँडर्ड कत्तलखाने ?डॉक्टर नी प्रोफेशनल नक्कीच रहावं कारण तुमचा डिग्रीवरचा खर्च,कर्मचाऱ्यांच्या पगारी,मेंटनन्स माजलगाव मध्ये जास्त आहे;पण प्रोफेशनल होण्या बरोबर थोडं सोशल ही व्हावं ही अपेक्षा रुग्णाने बाळगली तर चुकलं कुठं?
तसं पहायला गेलं तर हा सगळा स्टँडर्ड नेस सोडला तर बीएच एम एस, बी ए एम इस डॉ चे क्लिनिक तुमच्या पेक्षा बरे आहेत असच म्हणावं लागेल तिथली स्वच्छता, डॉकटर च रुग्णा सोबत वागणं-बोलणं,वाजवी फिस,कर्मचाऱ्यांच रुग्णांशी वागणं तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठं आहे?
पैसे घेताना 100 गोष्टी ऐकवनारे डॉक्टरांनी आरोग्य प्रशासनचे कोणते नियम आपण पाळतोत हेही रुग्णाला सांगावे किंवा दर्शनी भागात,दरपत्रक सह लावावे.आरोग्य प्रशासनने ही बाब गँभिरतेने घ्यावी.
हॉस्पिटलमध्ये कर्मचारी नर्सिंग चा कोर्स केलेले आहेत का?अग्निशमन ची व्यवस्था आहे का?निर्जंतुकीकरण ची सोय कितपत नियमांना धरून आहे?हे पण रुग्णांना कळू द्या.नाही तर लोकप्रश्न च्या माध्यमातून ते लोकांना आम्हाला सांगावे लागेल
नुसतं नाव आनंद असून चालणार नाही
.तुमच्या हॉस्पिटलमध्ये नाईट ला ऍडमिट रुग्णाला बीएचएमएस डॉक्टर चालतो आणि एखादा रुग्ण बी ए एम एस डॉक्टर ला दाखवून आला की त्याच्या नावाने खडे फोडायचे हे गणित अजून आम्हाला कळाले नाही.हॉस्पिटल चे नाव 'आनंद',समाधान,सेवा ठेवून चालणार नाही तर डॉक्टर च्या वागण्यातून रुग्णाला आनंद आणि समाधान मिळणं आवश्यक आहे.
सुशीलसेठ मधला 'शेठ' दीपक शेठ कडे आला
डॉ सुशील शेठ च्या चुलत्यानी ड्रेसेस च्या माध्यमातून माणसं, इज्जत,नाव कमावली पण डॉक्टर होऊन ही सुशीलसेठ मधला शेठ गेला नाही उलट त्यांचे सहकारी डॉ दीपक यांच्यात तो शिरला आणि डॉ दीपक 'शेठ' च्या तोऱ्यात बोलू लागले.पण रुग्णाचा अर्धा आजार केवळ गोड बोलण्यात जातो हे ते विसरले.सोशल होऊन माणसं जोडण्या ऐवजी प्रोफेशनल होऊन पैसा जोडल्याचा माज त्यांच्या बोलण्यातून जाणवू लागला आहे.
तपासणी फिस मध्ये तफावत कशी?
50 रु तपासणी फिस घेऊन एम एस डॉ तपासतो,150 रु तपासणी फिस एम डी, डिप्लोमा असणाऱ्या डॉक्टर ला का लागते ?3 दिवसात दुबार तपासणी फिस कशी घेतली जाते?3 दिवसात रुग्णाला गुण आला नाही हा तुमचा दोष आहे उलट रुग्णांचे शारीरिक व आर्थिक नुकसान केल्या मुळे 3 दिवसा पूर्वी घेतलेली फिस रुग्णाने परत का मागू नये?.जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन आरोग्य प्रशासनास तपासणी फिस विषयी नियमावली बनवण्यास सांगावे.
अलोपॅथी ची परवानगी द्या..!
माजलगाव शहरात हॉस्पिटल च्या नावाखाली बालरोगतज्ज्ञ नी पालकांना भावनिक करून लूट माजवली असून बी ए एम एस, बी एच एम एस डॉक्टर ना आजार कळतो पण सरकारची परवानगी नसल्यामुळे ते बालकांना आय पी डि मध्ये घेत नाहीत. सरकारने बी एच एम एस ,बी ए एम एस डॉक्टर ना अलोपॅथीची परवानगी द्यावी तेव्हाच ही लूट बंद होणार आहे.
Leave a comment