बीड । वार्ताहर
बीड शहरातील बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डच्या परीक्षेच्या निकालात आपले वर्चस्व दाखवून दिले. यावर्षी सिद्धांत रामभाड याने ९७.२ % गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा येण्याचा मान मिळवला तर शेख रोशनी ९६.४ % गुण मिळवून जिल्ह्यातून चौथी आली. क्लासच्या एकूण १२ विद्यार्थ्यांना ९० % पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर ७४% विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. एकूण १५ विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान अशा अवघड विषयात ९० पेक्षा जास्त गुण आहेत. दरवर्षी प्रमाने क्लासने १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.सिद्धांत रामभाड- ९७.२%, शेख रोशनी-९६.४%, सोहम इनामदार-९५.२%, नवनीत जाजू- ९४.८%, समृद्धी लोढा- ९४.४%, मयूर राऊत- ९३.६%, आशिष सारडा- ९२.४%, सलोनी सुपेकर- ९२.२%, प्राची सोलसे - ९१%, मधुसूदन मालानी- ९०.८%, हर्ष चरखा- ९०.२% या सर्व विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत.
दरवर्षी बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगचे विद्यार्थी बोर्ड परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात. मागील तीन वर्षांपासून आम्ही १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यावर भर देतो म्हणून आमचे विद्यार्थी भविष्यातील कोणत्याही स्पर्धेला सहजपणे सामोरे जातात. आम्ही आमच्या पुढच्या इयत्ता दहावीची बॅचची या लॉकडाउन काळात देखील सर्वोत्तम ऑनलाईन तयारी करून घेत आहोत अशी प्रतिक्रिया संस्थेचे संचालक इंजि. प्रविण बियाणी यांनी व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
Leave a comment