बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज शुक्रवारी (दि.17) पहाटे आरोग्य विभागाला स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यात 25 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे तर 1 अनिर्णयीय आहे. बाधीत रुग्णांमध्ये जिल्ह्यातील एका मोठ्या अधिकारी महिलेचाही समावेश आहे. परळीत 12, बीड तालुक्यात 9 तर गेवराई, आष्टी, माजलगाव व अंबाजोगाई येथील प्रत्येकी 1 रुग्ण कोरोना बाधित आढळुन आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात एकाच दिवशी 25 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जिल्ह्यातून पाठवलेल्या अहवालातील स्वॅबपैकी 25 रिपोर्ट शुक्रवारी पहाटे 1 वाजता प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 25 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत तर 1 अनिर्णित आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना बाधीत रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. बाधित रुग्णांमध्ये एका गुन्ह्यातील पिडीतेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेला आहे. बीड 35 वर्षीय महिला (रा.चंपावती नगर, बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), 30 वर्षीय पुरुष (रा.लिंबारुई) (पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), 24 वर्षीय महिला (रा.लिंबारुई) (पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), 27 वर्षीय पुरुष (रा.अजमेरनगर (बालेपीर), 44 वर्षीय महिला (रा.जुना बाजार), 33 वर्षीय पुरुष(रा.जुना बाजार), 26 वर्षीय पुरुष (बीड तालुक्यातील असुन नेमक्या पत्याबद्दल खात्री करणे सुरु आहे. 68 वर्षीय पुरुष (रा.घोसापुरी ता.बीड), 21 वर्षीय पुरुष(रा.युसूफीया मस्जीद जवळ, शाहुनगर), गेवराई-40 वर्षीय पुरुष (रा.मादळमोही ता.गेवराई), परळी-42 वर्षीय (रा.इंद्रनगर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), 28 वर्षीय महिला (रा.इंद्रनगर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), 12 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 40 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 22 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 32 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 34 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 30 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 36 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 09 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, 70 वर्षीय पुरुष (रा.भोई गल्ली,परळी), 38 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, आष्टी-38 वर्षीय महिला (रा.गंगादेवी ता.आष्टी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), माजलगाव-26 वर्षीय महिला(रा.जदिदजवळा ता.माजलगाव,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), 01-अंबाजोगाई-44 वर्षीय महिला(रा.विमल श्रृष्टी,चनई ता.अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.
150 रुग्णांवर उपचार सुरू
बीड जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 305 झाली आहे, त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा आता 305 वर पोहचला. पैकी 143 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कंटेटमेंट झोनमध्ये सर्व्हेक्षण
बीड आणि परळी शहरात सामूहिक संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य खात्याने मोठे पाऊल उचलले आहे. कंटेन्मेन्ट झोन भागात घरांघरात सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना टेस्टही वाढवण्यात आल्या आहेत. एकिकडे कोरोना रुग्ण वाढत असताना शहरातील गर्दी काही कमी होत नाही. खरेदीसाठी झुंबड उडत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
Leave a comment