बीडमध्ये 7, परळीत 6, माजलगाव, अंबाजोगाईत प्रत्येकी 2 तर आष्टी -गेवराई प्रत्येकी 1 रुग्ण
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे. आज बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एकुण 470 अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले. यातील 19 अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत तर उर्वरीत 451 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्वाधिक बाधित रुग्ण बीड तालुक्यात आढळले असुन यापाठोपाठ परळीत 6, माजलगाव-अंबाजोगाई प्रत्येकी 2 तर आष्टी-गेवराईत प्रत्येकी 1 रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
बाधीत रुग्णांमध्ये 28, 24, 70 आणि 36 वर्षीय पुरुष, तसेच 50 वर्षीय महिला रा.लिंबा, 32 वर्षीय महिला (रा.रानुमाता मंदिराच्या मागे,शाहुनगर,बीड) तसेच 63 वर्षीय पुरुष (रा.माळीवेस, चौक,बीड), परळीतील भीमनगर येथील 30 व 24 वर्षीय महिला तसेच 32 वर्षीय पुरुष, सिद्धार्थ नगर परळी येथील 12 वर्षीय मुलगा, इंद्रनगर परळी येथील 38 वर्षीय पुरुष, जुने रेल्वेस्टेशन परिसर परळी येथील 50 वर्षीय एस.बी.आय.ग्राहक महिला यांचा समावेश आहे तसेच गेवराई तालुक्यातील रामनगर तलवडा येथील 23 वर्षीय पुरुष आणि गेवराईतील रंगार गल्ली येथील 54 वर्षीय पुरुष, आष्टी शहरातील दत्त मंदिर गल्लीतील 45 वर्षीय पुरुष तर माजलगाव तालुक्यातील जदीद जवळा येथील 24 वर्षीय पुरुष आणि अंबाजोगाई येथील मोरेवाडी भागातील विमल सृष्टी येथे बार्शी येथून आलेल्या 43 वर्षीय महिलेसह 8 वर्षीय मुलाचाही बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात 19 बाधीत रुग्ण निष्पन्न झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
127 रुग्णांवर उपचार सुरु
बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 265 इतकी झाली असून यातील 126 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत तर 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. आता जिल्ह्यात 127 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान जिल्ह्यात गत सहा दिवसात तब्बल 71 नवीन रुग्ण वाढले आहेत.
Leave a comment