बीड । वार्ताहर
कोरोना लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील सर्वच बससेवा बंद होती. त्यामुळे बसस्थानक आणि बस आगार निर्मनुष्य झाले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी उभ्या असलेल्या बीड आगारातील बसमधील तब्बल 375 लिटर डिझेल चोरुन नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अज्ञातांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील सर्व बससेवाही पूर्ण बंद झाली होती. याच दरम्यान दि.21 मार्च ते 11 जुलै या या कालावधीत बीड आगारातून चोरट्यांनी 375 लिटर डिझेलची चोरी केली. डिझेल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर आगारातील कर्मचारी प्रकाश यादव यांनी रविवारी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली,त्यावरुन अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पो.ना.सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment