बीड । वार्ताहर
परळी तालुक्यातील नंदागौळ आणि ब्रह्मवाडी येथे कोरोना विषाणूची लागण झाल्याने या दोन्ही गावात कंटेटमेंट झोन घोषित करुन पूर्णवेळ बंद करुन पुढील अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत सोमवारी आदेश दिले आहेत.
परळी तालुक्यातील नंदागौळ येथे 1 कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे. त्यामुळे इतरत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून नंदागौळ येथे पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच परळी तालुक्यातीलच ब्रह्मवाडी पोस्ट टोकवाडी येथेही 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ब्रह्मवाडी पोस्ट टोकवाडी हे गाव कंटेटमेंट झोन घोषित करत पुढील अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Leave a comment