आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव या गावात मॉब लिंचिंगचा प्रकार घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पारधी समाजाच्या एका व्यक्तीला गावकर्यांनी एकत्रित येत मारून टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फत्तेवडगाव या गावात चोरी करण्याच्या उद्देशाने एक पारधी व्यक्ती आली होती.यावेळी गावातील काही लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच आष्टीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्याशी संपर्क साधला असता खुनाची घटना घडली आहे मात्र नेमका काय प्रकार आहे हे लवकर स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.
Leave a comment