बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून तपासणीला पाठवलेल्या आणखी 305 स्वॅबचे अहवाल आज सोमवारी (दि.13) सकाळी जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले. यात परळीतील 3 तर परळी तालुक्यातील नंदागौळ येथील 1 अशा एकुण 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.यातील 2 जण एसबीआयचे ग्राहक आहेत.
आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी एकुण 305 अहवाल प्राप्त झाले. यातील 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात परळीतील सिध्दार्थ नगर येथील यापूर्वीच्या बाधित रुग्णांचे सहवासित 30 वर्षीय पुरुष व 15 वर्षीय मुलगा, तसेच नंदागौळ (ता.परळी येथील एसबीआयचा 40 वर्षीय ग्राहक व पेठ मोहल्ला,परळी येथील एसबीआयची 35 वर्षीय ग्राहक महिला कोरोना बाधित निष्पन्न झाली आहे. दरम्यान उर्वरित 300 अहवाल निगेटिव्ह आले तर 1 अहवाल अनिर्णयीत असून आत 128 अहवाल प्रलंबित राहिले आहेत.
आता 108 रुग्णांवर उपचार सुरू
आता बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 240 झाली असून यापैकी 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे. सद्यस्थितीत 108 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment