बीड । वार्ताहार
विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होवू लागल्याने आणि सामाजिक अंतर न ठेवता, संख्येची मर्यादाही न पाळता विवाह सोहळा पार पडू लागल्याने कोरोनाचे रूग्ण वाढल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्याला केवळ 10 लोकांनाच परवानगी दिली असून या विवाह सोहळ्याची रितसर परवानगी संबंधीत पोलिस स्टेशन अथवा नगर परिषद, नगर पंचायतच्या मार्फत घेणे बंधनकारक केले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाबाधित रूग्णाने विवाह सोहळ्याला हजेरी लावल्यामुळे आणि या विवाह सोहळ्याला 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले. दोन दिवसापुर्वी एका विवाहा सोहळ्यामध्ये 200 पेक्षा अधिक लोक उपस्थितीत होते. तर एका विवाह सोहळ्यामध्ये 80 लोक उपस्थितीत असल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे 300 पेक्षा अधिक लोकांना क्वरांटाईन करावे लागले होते. यामुळे प्रशासनावरील ताणही वाढला होता. आता केवळ 10 लोकांच्या उपस्थितीत लग्न लावावे लागणार आहे. तसा अध्यादेश अप्पर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी काढला आहे.
Leave a comment