सर्वाधिक 7 बाधित बीड शहरात , गेवराईत 6 तर परळीत 4 जणांना लागण, आष्टी,धारुरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून शुक्रवारी (दि.10) सकाळी 293 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून यातील तब्बल 20 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 273 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सर्वाधिक 7 बाधित रुग्ण बीड शहरातील तर 1 रुग्ण बीड तालुक्यातील चौसाळा येथील आहे. चौसाळ्यात पहिल्यांदाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय गेवराईत 6, परळीत 4 तर आष्टी आणि धारुरमध्ये प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे. महत्वाचे हे की, बाधित 20 रुग्णांपैकी 12 रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित रुग्णांचे सहवासित म्हणजेच संपर्कात आले त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
बाधित रुग्णांमध्ये बीड मधील 8 जणांचा समावेश असून यात 50 वर्षीय पुरुष (संत तुकाराम नगर, बीड), 30 वर्षीय पुरुष (रा.तुळजाईनगर, बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 9 वर्षीय पुरुष (रा.घुमरे कॉमप्लेक्स, बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 55 वर्षीय महिला (रा. परवानानगर,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 32 वर्षीय महिला (रा. परवानानगर,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित),24 वर्षीय पुरुष (अश्विनी लॉजजवळ, शाहूनगर रोड,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 25 वर्षीय पुुरुष (अश्विनी लॉजजवळ, शाहूनगर रोड,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 43 वर्षीय पुरुष (रा.चौसाळा, ता.बीड) यांचा समावेश आहे. याशिवाय परळी येथील 4 बाधित रुग्ण निष्पन्न झाले असून यात 62 वर्षीय महिला (रा.विद्यानगर, परळी,एसबीआय बँक येथील पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 46 वर्षीय पुरुष (रा.नाथ्रा,एसबीआय बँक येथील पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित),35 वर्षीय महिला (रा.सिध्दार्थनगर,परळी) व 48 वर्षीय पुरुष (रा.गुरुकृपा नगर, नाथचित्र मंदिरसमोर, परळी) यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.गेवराई शहरात पुन्हा 6 कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. यामध्ये 25 वर्षीय पुरुष (रा.संजयनगर गेवराई,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 38 वर्षीय महिला (रा.ईस्लामपुरा, गेव राई, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 14 वर्षीय मुलगी (रा.ईस्लामपुरा,गेवराई,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 22 वर्षीय महिला (रा.इस्लामपुरा, गेवराई, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित), 47 वर्षीय पुरुष (रा.मोमीनपुरा,गेवराई), 60 वर्षीय पुरुष(रा.मोमीनपुरा,गेवराई) यांचा समावेश आहे. आष्टी येथील दत्त मंदिर गल्ली येथील 44 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती गुलबर्गा येथून आष्टीत परतलेला आहे. याशिवाय धारुरच्या साठेनगर येथील 42 वर्षीय व्यक्तीचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती पुण्याहून धारुरला परतला होता.
आता 97 जणांवर उपचार सुरु
आता बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 213 वर पोहचली आहे.यापैकी कोरोनामुक्त घेवून घरी परतलेल्या व्यक्तींची एकुण संख्या 119 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी बीडमधून एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर याच दिवशी तब्बल 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता सद्यस्थितीत बीड जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे व मुंबई येथे उपचार सुरु असलेल्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 97 झाली आहे.
Leave a comment