बीड । वार्ताहर
बीडमध्ये कोरोनाचे संकट वाढत चालले असतानाच आता काळजीही वाढत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी (दि.9) सकाळी स्वॅब घेतलेल्या बीडमधील एक महिला तर गेवराई येथील पुरुषाचा मृत्यू झाला आहे. यातील बीडच्या महिलेचा ह्रदयविकाराने तर गेवराईच्या पुरुषाचा डेंग्युने मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगीतले आहे.दरम्यान या दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मृत्यू झालेली बीडमधील महिला रुग्ण हृदयविकारामुळे तर गेवराईतील एक पुरुष डेंग्यूची लागण झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. शिवाय त्याच्या फुफुसात पाणी झाले होते.या दोघांना त्रास होऊ लागल्याने त्यांचे स्वॅब गुरुवारी तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. मात्र त्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला नाही. बीडच्या महिलेचा ह्रदयविकाराने तर गेवराईच्या पुरुषाचा डेंग्युने मृत्यू झाला असून त्या दोघांचेही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असल्याचे असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगीतले.
Leave a comment