राडी । वार्ताहर
पुनः निर्माण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महा एनजीओ फेडरेशन, पुणे यांच्या वतीने सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय संकटावर मात करण्यासाठी राडी नगरीतील वृध्द,महिला,पुरुष,तसेच गरीब गरजू लोकांना मास्क,आणि प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रोजगार निर्मितीसाठी गावातील महिला बचत गटांना मास्क बनवण्यासाठी काम देण्यात आले.
यावेळी उपस्थित पुनः निर्माण संस्थेचे नवनाथ गंगणे,बालाजी गंगणे,गणेश गंगणे,स्वप्नील गंगणे,रवी वैद्य,दत्ता वैद्य तसेच दत्ता भाऊ गंगणे, बालासाहेब गंगणे अरुण गंगणे, विशाल राडीकर, सौ.संजीवनी पुरी,तसेच गावातील इतर नागरिक यांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणाले, पुनःनिर्माण संस्था ही सामाजिक भान जपत समाजातील गरिब,गरजू,अनाथ,दुखी अश्या अनेक लोकांसाठी निरंतर कार्य करणारी संस्था आहे. संस्थेचे हे कार्य असेच निरंतर चालू राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण गरज आहे ती समाजातील सामाजिक भान असणार्या कार्यकर्त्यांची त्यामुळे आपण सर्वांनी संस्थेच्या कार्याला हातभार लावावा,असे प्रतिपादन त्यांनी केले.
Leave a comment