बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज रविवारी (दि.5) सकाळी आणखील 248 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रात्रीपर्यंत हे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-32, कोव्हीड केअर सेंटर बीड -55, स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई-2, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई -46, उपजिल्हा रुग्णालय परळी - 50,उपजिल्हा रुग्णालय केज-28,उपजिल्हा रुग्णालय गेवराई -19 आणि ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून 16 जणांच्या स्वॅबचा समावेश आहे.
Leave a comment