सुरुडी येथील तिघांना कोरोनाची लागण
आष्टी : रघुनाथ कर्डीले
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असून आष्टी तालुक्यात पाचव्यांदा पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केली असून रविवारी तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यापैकी आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून यामध्ये दोन महिला तर एक पुरुषाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.यापूर्वी आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील महिलेचा तर मातकुळी येथील पुरुषाचा बळी गेला आहे.
आष्टी तालुक्यात सर्वप्रथम सात एप्रिल रोजी पिंपळा येथील एका पुरुषास कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर मुंबईवरून पाहुणे म्हणून आलेल्या पाटण सांगवी येथील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला होता यानंतर मातकुळी येथील एका तरुणाला लागण होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर धनगरवाडी येथील एकास कोरोनाची बाधा झाली होती. तब्बल एक महिनाभर शांततेत असलेल्या तालुक्यात पुन्हा सुरूडी येथील मुंबईहून परत आलेल्या तिघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Leave a comment