बीडमधील 2 तर आष्टी तालुक्यातील तिघांचा समावेश
बीड | वार्ताहर
गत सहा दिवसात एकही बाधित रुग्ण न सापडल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज सोमवारी (दि.29) सकाळी पाठवलेल्या 37 पैकी 5 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित 32 अहवाल निगेटिव्ह आले. पाचपैकी तिघे जण आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील तर अन्य दोघे बीड शहरातील अजिजपुरा व दत्त नगर समोरील गल्लीतील रहिवासी आहेत.
सोमवारी (दि.29) सकाळी कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 37 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले होते. यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालय 10, आष्टी ग्रामीण रुग्णालय 9, माजलगाव ग्रामीण ररुग्णालय 4 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील 14 अशा एकूण 37 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता.सायंकाळी हे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून यात सुर्डी (ता.आष्टी) येथे मुबंईहून परतलेल्या 59 व 31 वर्षे महिलेसह 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर औरंगाबाद येथून आलेल्या (अजिजपुरा, बीड) येथील ३३ वर्षीय पुरूष व बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या (दत्तनगर समोरील गल्ली, बीड) येथील 44 वर्षीय पुरुषाचा या पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर अन्य 32 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यातील 10 रुग्ण सोमवारी कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. यातील 8 कोरोनामुक्त रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील तर अन्य 2 जण धारूर तालुक्यातील आहेत. दुसरीकडे आजपर्यंत जिल्ह्यात बाधीत निष्पन्न झालेल्या रुग्णांची संख्या आता 124 झाली आहे. यातील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तब्बल 101 जण बरे असून जिल्ह्यात आता 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment