जिल्ह्यातून नव्याने 37 स्वॅब तपासणीला
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातील 10 रुग्ण आज सोमवारी (दि.29)
कोरोनामुक्त होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. यातील 8 कोरोनामुक्त रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील तर अन्य 2 जण धारूर तालुक्यातील आहेत. दुसरीकडे सोमवारी (दि.29) सकाळी कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 37 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालय 10, आष्टी ग्रामीण रुग्णालय 9, माजलगाव ग्रामीण ररुग्णालय 4 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील 14 अशा एकूण 37 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होऊ शकतात. दरम्यान आज सोमवारी जिल्ह्यातील 10 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.आजपर्यंत जिल्ह्यात 119 बाधीत रुग्ण निष्पन्न झाले, यातील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तब्बल 101 जण बरे असून जिल्ह्यात आता 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment