बीडला आणखी दिलासा
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात शुक्रवारी आणखी एक बाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे. मात्र तो रुग्ण बीड जिल्ह्यातील नाही. त्याच्यावर आता अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.उर्वरित 18 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज शुक्रवारी (दि.26) सकाळी बीड जिल्ह्यातील 19 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 5, अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण महाविद्यालयातून 10,आष्टी ग्रामीण रुग्णालयातून 1,माजलगाव ग्रामीण रुग्णालय-2 आणि केज उपजिल्हा रुग्णालयात 1 स्वॅबचा समावेश होता. यातील स्वाराती रुग्णालयातील 10 पैकी एका रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा 28 वर्षीय पुरुष रुग्ण गिरवली (ता.भूम, जि.उस्मानाबाद) येथील राहिवाशी आहे. तर उर्वरित 18 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज बीड जिल्ह्यात 5 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.आजपर्यंत जिल्ह्यात 116 बाधीत रुग्ण निष्पन्न झाले, यातील 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तब्बल 91 जण बरे असून जिल्ह्यात आता 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment