धारुर । वार्ताहर
कोरोनामुळे गत तीन महिन्यांपासून गाड्यावर आपला व्यवसाय करून कुंटूंबाचा उदरनिर्वाह करणारे छोटे व्यवसायिक, व्यवसाय बंद असल्याने अडचणीत सापडले आहेत. त्यांना दररोजचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी पर्यायी उद्योगाचा शोध घेत फिरण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दोन महिने लॉकडाऊन व आता काही व्यवसायांना शासनाने सवलत दिली आहे; मात्र हातगाडा लावून व्यवसाय करणारे छोटे व्यवसायीक मात्र त्यांचे व्यवसाय अद्याप बंद असल्याने अडचणीत आले आहेत. त्यांना व्यवसायास आणखीही परवानगी दिली जात नसल्याने हे सर्व वडपाव, भेळ कचोरी पाणीपूरी, अंडा आम्लेट असे विविध पदार्थ विक्री करून आपला कुंटूंबाचा उदरनिर्वाह करणारे हे सर्व व्यवसायीक अडचणीत आले असून इतर व्यवसाया प्रमाणे पार्सल पध्दतीने हे विक्री करण्यास परवानगी देऊन व्यवसायीकाची अडचन व उपासमार थांबवावी अशी मागणी महादेव शिंदे, राजाभाऊ बोबडे, महादेव शिंदे, अमर औताडे, बबलू औताडे आदीनी केली आहे.
Leave a comment