डॉ.लहानेसह सहा जणांवर अंबाजोगाई पोलीसात गुन्हा
अंबाजोगाई । वार्ताहर
अंबाजोगाई परिसरातील जोगाईवाडी शिवारातील एनए लेआऊट असलेल्या प्लॉटच्या विक्रीचा ठराव करून एका व्यापार्याकडून ईसारापोटी 42 लाखाची रक्कम घेतली. मात्र संबंधीत व्यापार्यास नोंदणीकृत खरेदीखत करून न देता त्याची फसवणूक केली. याप्रकरणी सोमवारी (दि.22) सहा जणांविरूध्द अंबाजोगाई शहर ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ.श्रीहरी लहाने, अमोल श्रीहरी लहाने, भक्ती अमोल लहाने (तिघे रा.जिरेवाडी, बीड) तसेच शेख इलियास अहेमद महेमुद, मोहम्मद याकुब अब्दुल कादर सौदागर आणि नसीर तमीज बागवान (रा.औरंगाबाद) यांचा आरोपीत समावेश आहे. याबाबत व्यापारी सय्यद अफीक सय्यद लतीफ (रा.मिल्लतनगर अंबाजोगाई) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. फसवणूकीचा हा प्रकार 16 जुलै 2017 ते 22 जून 2020 या तीन वर्षाच्या कालावधीत घडला. व्यापारी सय्यद अफिक यांच्या फिर्यादीनूसार सहा जणांनी जोगाईवाडी शिवारातील सर्वे नं.460/1 मध्ये 8 हेक्टर 19 आर क्षेत्रफळातील एनए लेआऊट असलेले प्लॉट विक्रीचा ठराव करून वेळोवेळी माझ्यासह, पत्नी व सुनेकडून इसारापोटी 42 लाख रूपयाची नगदी रक्कम घेतली. मात्र प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत तयार करून देण्याचे आश्वासन देवून ते दिले नाही. यावरून वरिल सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक दहिफळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment