परिसरात काही शेतकर्यांसमोर पुन्हा बियाणे खरेदीची वेळ
धोंडराई । वार्ताहर
मागील आठवड्यात दोन दिवस सतत पडलेल्या जोरदार पावसाने शेतकर्यांमध्ये समाधान दिसुन येत असल्याचे चित्र तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी , भोजगाव गंगावाडी आदी गावातुन दिसुन आले होते मात्र मृग नक्षत्रात यावर्षी पडलेल्या पावसावर शेतकर्यांनी कापुस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली व ती जोमाने उगवत असुन काही भागात जोराचा पाऊस झाल्याने नांगरटीच्या शेतातुन पाणी बाहेर निघाल्याने लागवड केलेले कापुस बियाने दबुन गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर काही शेतकर्यांनी पाण्यावर लागवड केलेली सरकी आता पावसाने उघडीप दिल्याने त्यात औत मारणे व खुरपणीचे कामे जोमात चालू झाले आहेत.
या परिसरात गेल्या पंधारा दिवसा पासुन तसे शेतीकामास मोठा वेग आलेला आहे गेल्या वीस दिवसापुर्वी लागवड केलेली सरकी आता औत मारणे आळे खुरपण खते घालणे इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत उन्हाळ्यात सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करुन पेरणी योग्य शेत तयार करून ठेवत जसा जसा पावसाळा जवळ येत आहे तसतसे शेतीकामे शेतकरी उरकुन घेत असल्याचे दिसुन येत आहे या परीसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झालेली आहे उर्वरीत क्षेत्रात कापुस तूर,मुग, भुईमुग,बाजरी,उडीद या पिकाची पेरणी झाली आहे तर ती आता खुरपण कोळपणी औत मारण्याचे कामे वेगात चालू आहे ऊसाबरोबर आता काही शेतकरी फळबागाकडे वळल्याचेही दिसत आहे. असे असताना मात्र धोंडराई च्या काही भागाला अद्याप ही पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात लावलेली कपासी आता माना टाकायला लागल्याने शेतकर्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहते की काय अशी भिती आता शेतकरी वर्गात दिसत आहे.
Leave a comment