माजी आ.भीमराव धोंडे यांची मागणी
आष्टी । वार्ताहर
सध्या शेतकर्यांजवळ खरीप पेरणीस खते,बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत.शेतकर्यांची कर्जमाफी झाली असली तरी अनेक शेतकरी कर्जमाफीपासुन वंचीत आहेत असे वंचीत शेतकरी व ईतर शेतकरी पिककर्ज लवकर मिळावे अशी मागणी आमच्याकडे करीत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालुन पिककर्ज देण्याच्या सुचना द्याव्यात. जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांना पिककर्ज देण्यासाठी सर्व बँक अधिका-यांची विशेष बैठक घ्यावी अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षीचा खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकर्यांची आर्थिक परिस्थीती डबघाईला आल्यामुळे त्यांच्याजवळ खरीपाची पेरणी करण्यासाठी खते, बी- बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत.बँक अधिकार्यांनी शेतकर्यांना वेठीस धरु नये. शेतकर्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालुन पिककर्ज देण्याच्या सुचना द्याव्यात असे भीमराव धोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकाचे अधिकार्यांनी तात्काळ पिककर्ज वाटप करण्याचे आदेश देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली.
Leave a comment