केज,धारुर तालुक्यातील घटना; तिघांवर गुन्हा
केज-धारुर । वार्ताहर
खरीपाच्या पेरण्या सुरु होताच पेरणी अन् बांधाच्या कारणावरुन वाद उफाळून येवू लागले आहेत. केज तालुक्यातील बोरगाव आणि धारुर तालुक्यातील पिंपळदरा येथे दोन घटना घडल्या आहेत.
केज तालुक्यातील बोरगाव शिवारात रवींद्र गोरख भिंताडे हे शनिवारी (दि.20) पेरणी करुन जात असताना दत्तात्रय भागवत शिंदे व औदुंबर दत्तात्रय शिंदे या दोघांनी त्यांना रस्त्यात अडवले. तुम्ही इथे कशी काय पेरणी केली, पेरलेले सोयाबीन मोडून टाकीन असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करुन यापुढे इथून गेलात तर जिवे मारु अशी धमकी दिली. रवींद्र भिंताडे यांच्या तक्रारीवरुन दोघांवर केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसर्या घटनेत पिंपळदरा (ता.धारुर) येथील बालाजी दत्तु नागरगोजे (रा.घागरदरा,ता.धारुर) हा तरुण त्याच्या शेतात खरीप ज्वारीची पेरणी करत असताना आश्रूबा शिवाजी नागरगोजे याने ‘माझ्या शेताचा बांध दाखवा’ असे म्हणाला. यावर बालाजीने मला माहित नाही नंतर बघू असे उत्तर दिले. त्यानंतर संतापलेल्या आश्रूबाने बालाजीच्या डोक्यात पाठीमागून दगड मारुन दुखापत केली. भांडण सोडवणार्या इतरांनाही लाथाबुक्क्याने मारहाण कतर बालाजीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीविरुध्द धारुर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Leave a comment