अंबाजोगाई । वार्ताहर

कोरोना सदृश्य परस्थितीचा सामना करत असताना ज्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी,पत्रकार यांनी बलिदान केलेल्या व चीन सोबत झालेल्या चकमकीत जे शहीद झालेल्या जवानांना अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मागील 3 महिन्यांत कोरोना सदृश्य परस्थितिचा सामना करत असताना या देशात ज्या डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी,पोलीस कर्मचारी, पत्रकार यांनी जे बलिदान केलं,ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्यासह चीन सोबत झालेल्या चकमकीत जे जवान शहीद झाले त्या सर्वांना अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.नगरपरिषद परिसरातील दैनिक सामना कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली सभेला मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया,मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार,जेष्ठ पत्रकार अ.र.पटेल,हनुमंत पोखरकर,रमाकांत पाटील, जगन सरवदे,रणजित डांगे, राहुल देशपांडे,पुनम परदेशी,मुशीर बाबा,ज्ञानेश मातेकर,अशोक दळवे, मारोती जोगदंड,जनसहयोग चे शाम सरवदे,अ‍ॅड.ढेले आदी मंडळी उपस्थित होती.या वेळी सर्वांनी 2 मिनिट स्तब्ध राहुन शहिद व बलिदान कर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.