परस्पर विरोधी तक्रारीवरुन आठ जणांवर गुन्हे
केज । वार्ताहर
तालुक्यातील कोडेवाडी येथे शेत नांगरणी करीत असताना बांध नांगरल्याच्या कारणावरून दोन शेतकर्यांत भांडण होऊन एकास कुर्हाडीने मारहाण करण्यात आली आली. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरुन आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
कोरडेवाडी येथे गोविंद शिवगीर गिरी यांच्या शेजारी जालिंदर गिरी यांची जमीन आहे. रविवारी (दि.21) दुपारी 2 वा.जालिंदर गणेश गिरी, संजय जालिंदर गिरी, समाधान उर्फ राजू गिरी यांनी ट्रॅक्टरने क्र. (एमएच-42एफ-1403) सार्वजनिक बांध नांगरला. त्यावेळी गोविंद गिरी हे त्यांना बांध नांगरु नका म्हणाले असता तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. जालिंदर गिरीने कुर्हाड, दगड मारून जखमी केले.त्यांचा नातू प्रभुराम अशोक गिरीलाही जखमी केले. गोविंद शिवगीर गिरी यांच्या फिर्यादीवरून जालिंदर गिरी, संजय गिरी, समाधान उर्फ राजू गिरी आणि दैवशाला गिरी या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोहेकॉ.बालकृष्ण मुंडे हे तपास करीत आहेत. दरम्यान जालिंदर गिरी यांनीही गोविंद गिरी, कृष्णा गिरी, भागवत गिरी आणि अशोक गिरी या चौघांनी कुर्हाडीच्या दांड्याने मारहाण करून डोके फोडले अशी तक्रार दिली असून या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोहेकॉ. श्रीराम चेवले हे तपास करीत आहेत. सदर भांडणात ट्रॅक्टर क्र एमएच-42/एफ-1403 शेतनांगरणी करीत असतानाचे फोटो शेतकर्यांनी काढला असून जिल्हाधिकारी यांनी बांध नांगरणार्या ट्रॅक्टरवर गुन्हा डाखल करण्याचे आदेश दिले असल्याने आता त्यावर काय कार्यवाही होणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a comment