धोंडराई । वार्ताहर
धोंडराई हे गेवराई तालुक्यातील एक जिल्हा परिषद सर्कलचे मोठे गाव असुन गावात यापूर्वी विकास कसा असतो हे ग्रामस्थांना पहायला मिळत नव्हता परंतु सध्याला गावातील एक नवतरुण गावाचा विकास व्हावा या उद्देशाने आमदार लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात उतरण्याचे धाडस त्याने केले. काय आहे त्या तरुणाचा जीवनप्रवास व त्याने केलेल्या विकासकामांचा आराखडा:
गौरव खरात हे एक उच्च शिक्षीत तरुण आहेत. शिक्षणानंतर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला त्यातच गावात त्यांना काहीच विकासकामे नसल्याचे दिसून आले आणि त्यांनी त्याच क्षणी राजकारणात उतरुन गावाचा विकास करण्याचा मनाशी निश्चय केला आणि 2011 साली त्यांची ओळख तात्कालीन उपनगराध्यक्ष व विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी एका कार्यक्रमात गेवराई येथे झाली आणि तेंव्हापासुन तालुक्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा नेता व तालुक्यातील विकासाबद्दलची खरी भावना असणारा नेता याची जाणीव गौरव खरात यांना त्या भेटीतून आली व त्याच क्षणी आपण पण कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांच्या सोबत व आमदारांच्या विचाराधीन राहुन काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तेंव्हांच त्यांनी गावच्या विकासाचा वसा आपल्या हाती घेतला.2011 ला आण्णांसोबत काम करण्याचा निर्णय गौरव खरात यांनी घेतला त्यांनंतर लक्ष्मण आण्णा पवार हे 2014 ला भाजपकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आणि ती निवडणूक लक्ष्मण पवार साठ हजारांच्या फरकाने जिंकले त्या वेळेस धोंडराई सर्कल मधुन गौरव खरात यांच्या नेतृत्वाने लक्ष्मण पवारांना लिड देखील मिळाली तेव्हांपासुन सुरु झाला तो धोंडराईचा विकास.
आमदार पवारांनी धोंडराईसाठी काही विकास कामे दिले ते गौरव खरात यांनी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या गावांमध्ये पार पाडले.यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला गावच्या बसस्टँडवर चिखलमय होत असलेला रस्ता त्यांनी सिमेंट चा बनवुन घेतला. बसस्थानक परिसरात असलेल्या मारोतीच्या मंदीराचा सुसज्ज असा सभामंडप त्यांनी आमदारांच्या माध्यमातून बनवुन घेतला. त्यानंतर गावातील धनगर गल्लीमध्ये सुसज्ज असा सिमेंट रोड चे कार्य यशस्वीपणे पार पाडले,जुन्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागील रोड सिमेंट चा केला , जिल्हा परिषदेची जुनी शाळा नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले व शाळा स्थलांतरीत केली. त्याठिकाणी मुलांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने त्यांची हाल होऊ नये म्हणून त्यांनी स्वत: त्याठिकाणी पाणी उपलब्ध करून दिले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चाळीस वर्षे गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना डांबरी रस्ता पहायला मिळत नव्हता व चिखलमय होता असा रस्ता त्यांनी चिखलमुक्त करण्यासाठी सुंदर असे डांबरीकरण केले . गावातील 760 निराधार लोकांना गौरव भैय्या खरात यांच्या प्रयत्नातून पगारी चालु झाल्या.तसेच गावातील काही गरीबांच्या मुलांना इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कै भाऊराव पाटील इंग्लिश स्कूल ची स्थापना धोंडराई गावात केली आणि गरिब मुलांना कमीत कमी फिस मध्ये शिक्षणासोबत गणवेश शिक्षण उपयोगी साहित्य देण्याचा प्रामाणिक उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे.गावातील छोटं मोठ्या कारणांवरून झालेले वाद हे गावातल्या गावातच मिटविण्यासाठी देखील ते यथोचित प्रयत्न करत असतात.गौरव खरात यांचे गावासाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी सदैव प्रयत्न असतात आणि ते सातत्यात उतरवितात.एवढेच नाही तर एकेकाळी गावांमध्ये कार्यकर्त्यांची फळी ही कमी असल्यामुळे खचुन व न डगमगता गावात ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनॉल उभा करुन आपल्या नेत्याचा विश्वास गौरव भैय्या यांनी संपादित केला.गावात दुःख असो वा सुख या कोणत्या ही परिस्थिती त काम करत व कोणाशीही बेइमानी न करता पवार घराण्याशी असलेली अस्ता व विश्वास कायम टिकवण्यासाठी गौरव खरात यांचा प्रयत्न सध्या सत्य ठरलेला दिसून आला आहे.या सर्व विकास कामांमुळे व त्यांच्या प्रामाणिक पणामुळे त्यांच्यावर गावातील लोकांचा विश्वास अधिकच मजबुत झाल्याचा दिसतो आहे.
गौरव खरात त्यांच्या या कुशल वागणुकीमुळे तसेच काम करण्याच्या शैलीने अनेकांच्या मनावर विजय मिळवला आहे .गौरव यांची ओळख लहान मुलांपासून ते वडीलधार्या मंडळीपर्यंत भैय्या या नावाने तयार झाली आहे.आमदार लक्ष्मण आण्णा पवारांसोबत काम करत असताना गौरव खरात यांच्या कुटुंबावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता तो म्हणजे दिनांक 18 फेबु्रवारी 2019रोजी त्यांचा लहान भाऊ वैभव खरात यांचे अकाली निधन झाले.वैभव यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण खरात कुटुंबीय दुःखाच्या सावटात सापडले होते एवढे मोठे दुःख डोक्यावर असतानाही गौरव यांनी काम करण्याचे धाडस गमावले नाही.धोंडराई सर्कल मधील धडाडीचे नेतृत्व म्हणुन अन्नामुळे त्यांची एक ओळख निर्माण झाल्याची दिसत आहे.गावामध्ये कार्यकर्त्यांची फळी ही कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव खरात यांनी धोंडराई मधील 200 युवकांचा भारतीय जनता पार्टी म्हणजेच कार्यसम्राट आमदारांकडे प्रवेश करुन घेतला .याच काम करण्याच्या उत्कृष्ट शैलीमुळे व आमदारांशी एकनिष्ठ राहिल्यामूळे गौरव यांची गावातच नव्हे तर संपूर्ण गेवराई शहर व तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख तयार झाली आहे.व गावात केलेल्या विकासकांमांमुळे गावकर्यांकडुन देखील त्यांचे कौतुक केले जातेय . गौरव यांच्यासारखाच विकास जर गावात होत राहिला तर गावात विकास करायला शिल्लक राहणार नाही.
Leave a comment