नेकनुर/मनोज गव्हाणे

      व्यस्त दिनक्रमातून स्वतःसाठी वेळ देणे अशक्य असले तरी इच्छाशक्ती फलदायी मार्ग दाखवते असेच काहीसे नेकनूरचे एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी 15 जून पासून  हाती घेतलेल्या मोहिमेने पुढे आले. सुरुवातीला पत्नी,मुलासमवेत सुरू केलेल्या या उपक्रमात दिवसेंदिवस अनेक हात जोडले जात असून   सकाळच्या प्रहरी डोंगरदऱ्यात  सहकाऱ्यांसमवेत त्यांची मोहीम हजारो बीजरोपण करत  आतापर्यंत चार हजार बियांचा टप्पा पूर्ण करणारी ठरली. दमदार पाऊसा आगोदर मोठा टप्पा पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन कौतुकास्पद आहे.
         सकाळी सहा वाजताच आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कपिलधार, मांडवखेल डोंगरात नेकनुर पोलीस स्टेशनचे एपीआय लक्ष्‍मण केंद्रे  विविध वृक्षाचे बीजरोपण करण्यासाठी दाखल होत आहेत . यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात होणारी ट्रेकिंग अनेक फायदे देणारी आहे .शारीरिक व्यायामासोबत मानसिक शांती  भविष्यात हजारो झाडांनी या डोंगर माथ्याला हिरवाशालू  सीताफळाची गोडी देणारा ठरणार आहे. सिताफळ, बाभूळ, खैर, बोर या झाडांच्या बिया छोट्याशा खड्ड्यात रोवल्या जात असून आता ही मोहीम पाणी फाउंडेशन मध्ये यशस्वी झालेल्या मांडवखेलच्या डोंगरात शनिवारपासून पोचली असून गावातील युवक तरुणांचा, ग्रामस्थांच्या उत्साहाने या मोहिमेला मोठे बळ लाभले आहे. शुक्रवारी कळसंबर येथील आपला परिवार वृद्धाश्रमात वृक्षारोपण करण्यात आले .शनिवारी सकाळी मांडवखेल डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात बीजरोपण करण्यात आले. वृक्षावर प्रेम करणारा हा निसर्गप्रेमी जिथे कुठे कर्तव्याला असेल तिथे आपल्या हातून  वृक्ष संवर्धनाचे मोठे काम करतो . आपण करत असलेल्या बीजरूपनाने निसर्ग समतोल शिवाय यामुळे कोणालातरी फळांची गोडी चाखायला मिळेल या आनंदातच त्यांच्या कार्याने मोठा आकार घेतला असून अजून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, बीजरोपण करण्यासाठी त्यांची टीम प्रयत्नशील राहणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.