नांदूरघाट । वार्ताहर
माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव बाजीराव ढाकणे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
त्यांचे मूळ गाव केज तालुक्यातील सारुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दोन मुली नातवंडे जावई असा परिवार आहे,. त्यांच्या निधनानंतर परिसरामध्ये शोककळा पसरली. घाटनांदुर चौकीचे बीट अंमलदार मुकुंद ढाकणे यांचे ते वडील होते, बीड जिल्ह्यात पोलीस कर्मचारी म्हणून शामराव बाजीराव ढाकणे यांनी बीड, परळी आदी ठिकाणी आपली सेवा देत नोकरी केली. त्यांच्या निधनाने सारुळ व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेे.
Leave a comment