बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज रविवारी (दि.21) पुन्हा 31 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21, कोव्हीड केअर सेंटर बीड 3, आष्टी ग्रामीण रुग्णालय 1, गेवराई उप जिल्हा रुग्णालयातून 2 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून 4 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.सायंकाळपर्यंत हे सर्व रिपोर्ट प्राप्त होतील.
Leave a comment