दिल्ली : -
करोना संक्रमणासारख्या कठीण प्रसंगी देशवासियांना प्राधान्य देतानाच भारतानं शक्य तेवढी इतर देशांनाही मदत करण्याचा निर्णय घेतलाय. भारत हा एन्टी मलेरिया मेडिसीन 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' आणि पॅरासिटामॉलचा मोठा उत्पादक देश आहे. या टॅबलेटचा पुरवठा करण्यासाठी भारतानं १३ देशांची यादी बनवली आहे
करोना व्हायरसविरुद्ध लढाईत जगातील अनेक देशांसाठी भारत एक 'देवदूत' ठरलाय. १३० कोटी जनसंख्या असलेल्या भारतानं लॉकडाऊनसारखे कठोर उ पाय लागू करत इतर देशांच्या तुलनेत करोनावर बऱ्यापैंकी नियंत्रण मिळवलंय असं म्हणायला हरकत नाही. परंतु, भारतानं आपल्या नागरिकांसोबतच इतर देशांसाठी आपल्या औषधांचं भांडार खुलं केलंय. अमेरिकासारखी महाशक्ती असो... युरोपीय देश असो किंवा सार्कचे इतर सहयोगी देश... मानवता सर्वोच्च स्थानी ठेवत भारतानं प्रत्येक देशाला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' (HCQ) साठी भारतानं १३ देशांची यादी तयार केलीय.
11
Apr
Leave a comment